माणगाव चांदोरे गावात आढळला कोरोना रुग्ण; तालुक्यात ३९ बाधितांपैकी ६ रुग्ण झाले बरे


माणगाव(सलीम शेख)
     माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे.शनिवार दि.२९ मे २०२० रोजी सायंकाळी उशिरा तालुक्यातील चांदोरे गावातील १ रुग्णाचा स्वँब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तालुक्यात कोरोनाची लागण झालेल्या ३९ बाधित रुग्णांपैकी ६ रुग्ण ठणठणीतपणे  बरे झाल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली.
     लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात दरदिवस माणगाव तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने साऱ्यांचीच डोकेदुखी आता वाढू लागली आहे.  लॉकडाऊनच्या. तिसऱ्या टप्प्यात अखेरपर्यंत कोरोना संसर्गापासून मुक्त असलेला माणगाव तालुका चौथ्या टप्प्यात बाधित झाला.तालुक्यातील १६ गावांतून आतापर्यंत ३९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ६ रुग्ण बरे  झाल्याची माहिती तहसीलदार यांनी प्रसार माध्यमांजवळ  बोलताना दिली.तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी याबाबत दक्षता बाळगून  सरकारने केलेल्या सुचनांचे पालन करीत सतर्क व जागरूक राहून आपल्या तालुक्यात कोरोना विषाणूला कशाप्रकारे आळा घालता येईल याचा गांभीर्यपूर्वक विचार सर्वांनी करून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

Comments