प्राणी शिकले परंतू आपण कधी शिकणार ?
नंदकुमार मरवडे (खांब-रोहे)
कोरोनाच्या वाढत्या प्रभावापासून सोशल डिस्टन्सिंगची शिस्त सर्वत्र पाळली जात असून याचा प्रभाव प्राण्यांवरही झालेला दिसून येत आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी आपल्या केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. 'घरीच रहा, सुरक्षित रहा' आवश्यक कामासाठीच बाहेर पडा. आपले व आपल्या परिवाराचे कोरोनापासून संरक्षण करा. अशाप्रकारच्या सुचना विविध प्रसार माध्यमातून वारंवार दिल्या जात आहेत. तर काही शंका आल्यास त्वरीत डाँक्टरांशी संपर्क साधून निदान करून घ्या. जेणेकरून पुढील उपचार पद्धती सहजसुलभ होईल.
कोरोनापासून बचाव व्हावा व शासकीय प्रयत्नांना यश यावे यासाठी देशवासीय देखील चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. एरव्ही बाजारात दाटीवाटीने असणारी माणसे आज कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत आहेत. तर या सोशल डिस्टन्सिंगचा प्रभाव इतर पाळीव प्राण्यांवरही पडला असून तेही सोशल डिस्टन्सिंग पाळत असल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिस दलातील श्वान पथकातील श्वास प्रशिक्षण घेताना, त्यांच्यासाठीचे खाणे घेताना, विश्रांती घेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतानाचा व्हिडीओ विविध न्यूज चँनलवर प्रसारित झाला होता व सा-यांनी या श्वानांचे कौतूकही केले होते. कोरोनामुळे माणसाच्या स्वभावात बदल होताना दिसत आहे. तर भविष्यात देखील विविध बाबतीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वंयशिस्तीचे धडे गिरवले तर शासकीय यंत्रणेवर येणारा ताण तर कमी होईलच याशिवाय पुढील पिढीला देखील बालवयातच शिस्त लागेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.
Comments
Post a Comment