वार्ताहर (जेएनपीटी)
चिरनेर गावचे पोलिस पाटील संजय पाटील, त्यांचे बंधु सुरेश पाटील, सतिश पाटील आणि डॉ नितिन पोवळे यांच्यावतीने चिरनेर गावातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या आयुर्वेदीक गोळ्यांची भेट दिली. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे या गोळ्या सुपूर्द केल्या.
कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. भारत
सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुध्द प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक एल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध सुचविण्यात आले आहे. चिरनेरचे पोलिस पाटील संजय पाटील आणि त्यांचे बंधू आणि चिरनेर गावचे सुपूत्र आणि प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर नितिन पोवळे यांनी स्वतःच्या खर्चाने ग्रामस्थांसाठी या गोळ्या उपलब्ध करून दिल्या. चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Comments
Post a Comment