धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार


गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शकतत्वे जारी

मुंबई : लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कंटेनमेंट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील. ३० जून पर्यंत फक्त कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल. धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार आहेत. कन्टेन्मेन्ट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउन कायम असणार आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढील एक महिन्यासाठीचे लॉकडाउनचे नवे निर्देश दिले आहेत. ज्यानुसार ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Comments