मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकेशन सोसायटीतर्फे माणगांव पोलिसांना पीपीई किट वाटप

विश्वास गायकवाड (बोरघर-माणगांव) 
         माणगांवात कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना सामाजिक बांधिलकीतून रोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकेशन सोसायटी माणगाव या संस्थेच्यावतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ चा मुकाबला करणाऱ्या माणगांव पोलीस व वाहतूक सेवेतील पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी १५ पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
         मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन  सोसायटी  माणगांव  मार्फत व रायगडमधील माणगांव येथील सामाजिक, शेक्षणिक व ज्यांना रोजगार, नोकरी नाही अश्या बेरोजगारांना मुंबई, पुणे, महाड, रोहा या ठिकाणी नोकरी मिळवून देण्याचे व मार्गदर्शनाचे काम करते. कोविड १८ योद्ध्यांना सुरक्षा म्हणून १५ पीपीई किटचे वाटप होडगाव गावाचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी संचालित शिवम काॅंमप्युटर एज्युकेशन सेंटर माणगाव या संस्थेचे सह संस्थापक सुशिलदादा कदम व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त श्री गोरक्षनाथ नवनाथ मंदिर ढालघर मठाचे अध्यक्ष शांताराम बाळू खाडे उर्फ खाडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामदास इंगवले यांच्याकडे एकूण १५ पीपीई  किट देण्यात आले.
          सोसायटीचे संस्थापक डॉ. मुरलीधर वाणी, सेल टॅक्स ऑफिसर रायगड विभाग सतीश सावंत, मुरलीधर कदम, जयदास म्हस्के, होडगांव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच शंकर खाडे, रूपेश खाडे, मा. मुख्याध्यापक सचिन कदम उपस्थित होते. 

Comments