नागरिकांकडून स्वागत
मुकुंद रांजणे (माथेरान)
माथेरानमधील कोरोनाची बाधा असल्याचे अहवाल मिळालेले तीन रुग्ण आज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन माथेरानमध्ये परतल्याने त्यांच्यावर आज पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले .
माथेरान मध्ये दि. १९ मे रोजी एका हॉटेलमध्ये काम करणारे दांपत्यांपैकी एकाला कोरोनाची लागण दिसून आली होती आणि त्यात एक महिला पॉझिटिव्ह सापडल्याने संपूर्ण गावात घबराट पसरली होती. या दांपत्यांना ज्याठिकाणी कोरोन्टाईन करण्यात आले होते त्याच ठिकाणी आपल्या गावातील दोन महिला सुध्दा तेथेच विलगिकरण कक्षात असल्यामुळे त्यांनाही कोरोनाची पॉझिटिव्ह लक्षणे आढळून आली होती, त्यानुसार त्यांनाही उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले होते. परंतु या दोघींचीही तब्बेत उत्तम असून त्या दोघींचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याच प्रमाणे येथील एक पुरुष देखील बाधित आढळला होता तोही तंदुरुस्त असल्याने रविवारी माथेरानमध्ये येत आहेत. माथेरान कोरोना मुक्त असल्याचे सिद्ध झाले असल्यामुळें त्यांच्या स्वागतासाठी माथेरानकरांच्यावतीने या सर्वांवर पुष्पवृष्टी करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माथेरान कोरोना मुक्त रहावे ह्या करिता माथेरानमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी खूपच मेहनत घेतली होती. त्यातच एका डॉक्टरलाही कोरोनाची लक्षणे आढळून आली तरीही हे कर्मचारी कार्यरत होते. मागील तीन महिन्यांपासून त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही त्यामुळे डॉ. प्रशांत यादव, परिचारिका स्नेहा गोळे, श्वेता रांजाने, इंगळे, राजेश वाघेला व डॉ. उदय तांबे ह्यांचेही विशेष कौतुक ह्या वेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment