उरण तालुक्यात १२ रूग्णांची वाढ तर ६ जण कोरोना मुक्त



अनंत नारंगीकर
        जेएनपीटी : उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मंगळवार दि३० रोजी १२ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या २७२ झाली आहे.
        मंगळवार दि. ३० जून रोजी उरण तालुक्यात १२ कोरोना पॉजेटीव्ह आढळले. त्यामध्ये गोवठण - १, हनुमान कोळीवाडा - १, चिरनेर - १, करंजा - २, केगावा - १, बोकडविरा -१, पागोट-१, जेएनपीटी - ३आणि रांजणपाडा - १ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. उरण तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या २७२ झाली आहे. तर उरण तालुक्यातील ६ रूग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. सोमवार दि. २६ रोजी म्हातवली येथिल एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या चार आहे. यामधील २०९ रूग्ण पुर्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत उरण तालुक्यात ५९ एक्टीव्ह रूग्ण असल्याची माहिती तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

Comments