सलीम शेख (माणगाव)
माणगाव-निजामपूर रस्त्यावर जवळच्या अंतरावर असलेल्या पाणाेसे नदीच्या पुलाजवळ तीन चाकी बेकरी प्राेडक्ट वाहतुक करणारा टेम्पाे व दुचाकी यांच्यामधे रविवार, दि. २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे व एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातातील दुचाकीस्वार हे पाणाेसे आदीवासीवाडीतील रहीवासी असुन मृत व्यक्तीचे नाव मनेश काेळी (२२) तर अपघातात जखमी झालेला व्यक्ती लहु काेळी (२४ ) आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतुक पाेलीस निवास साबळे, पी. बी. धायगुडे व पाे. हे. काँ. उद्धव टेकाळे, पाे. ह. शिवाजी चव्हाण पाे. काँ. अभिषेक साटम यांनी ताबडताेब धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमीस माणगांवातील १०८ रुग्णवाहीका चालक सुरेश लाड यांच्या मदतीने माणगांव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment