सलीम शेख (माणगाव)
माणगाव तालुक्यातील वाढवण येथील एका ४५ वर्षीय इसमाचा घरातील इन्व्हर्टरची पीन बोर्डात लावीत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सदरील घटना रविवार, दि.२९ जून २०२० रोजी पहाटे घडली. या घटनेने इंदापूर विभागासह माणगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची खबर प्रशांत जगन्नाथ शिंदे रा.वाढवण ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत दिलीप पांडुरंग शिंदे (४५) हे त्यांच्या घरातील लाईट आल्याने इन्व्हर्टरची पीन बोर्डात लावत असताना त्यांना लाईटचा जोरात शॉक लागला. त्यांना औषधोपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि नंबर २८/२०२० सीआरपिसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.

Comments
Post a Comment