महेंद्र म्हात्रे
नागोठणे : शहरासह विभागात कोरोनाच्या विषाणूंनी आपले जाळे घट्ट करण्यास सुरुवात केली असून विभागातील पळस ग्रामपंचायत हद्दीतील शेतपळस एका ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही लागण एखाद्या कंपनी मार्फतच झाली असल्याचा संशय प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी व्यक्त केला. दोनच दिवसांपूर्वी नागोठणे शहरातील दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील सात जणांचा स्वॅब तपासणी करण्यासाठी आज दुपारीच रवाना करण्यात आला असून मंगळवारच्या रात्रीपर्यंत त्यांचा रिपोर्ट अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment