नंदकुमार मरवडे (खांब-रोहा)
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यामधील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या निवी - तळाघर-बोरघर- लांढर-तांबडी - वाली व रोहा शहर वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या माध्यमातून यंदा १ जुलै बुधवार रोजीच्या आषाढी एकादशी निमित्ताने काढण्यात येणारी पायी दिंडी सोहोळ्याचे आयोजन कोरोना व्हाईरसचा वाढतख प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली आहे.
रोहे शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे वाढता संक्रमण पाहता तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आदेशांचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पाळन व आदरपूर्वक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरचा महत्वपूर्ण निर्णय सांप्रदायाचे वतीने घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या महामारीचे आलेले संकट परतवून लावण्याकरिता आणि त्याचे वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून सामाजिक सुरक्षिततेच्या जाणिवेचे भान ठेवित परंपरागत वर्षोंवर्षे चालत आलेली निवि - तळाघर, बोरघर, लांढर,तांबडी - वाली,रोहा शहर आदी दशक्रोशितील वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या माध्यमातून बुधवार दि.१ जुलै रोजी च्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने काढण्यात येणारी पायी दिंडी चे अजोयान रद्द करण्यात आले असून आपल्या सर्वांच्या व तालुक्याच्या सुरक्षिततेचे द्रुष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रायगड भूषण मधूकरबुवा बामुगडे व ह.भ.प.बाळाराम महाराज शेळके यांनी सांगितले आहे.
सदरील पायी दिंडी सोहळ्यामध्ये निवी, तळाघर, बोरघर, लांढर,तांबडी - वाली वारकरी सांप्रदायिक पंचक्रोशी आदी ग्रामीण परिसरासह रोहे शहरातील अधिकाधिक वारकरी व भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थिती व सहभाग दर्शवून दिंडीची शोभा वाढवीत असतात तरी सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळीने याची नोंद घ्यावी असे पायी दिंडी चे आयोजक सर्वेसर्वा सर्वश्री हभप.मधुकर (बुवा) बामुगडे,हभप.बाळाराम महाराज शेळके,हभप.नामदेव ओमले,विठ्ठल गायकर,रुपेश महाराज शेळके, संकेत खेरटकर प्रवीण कदम,चेतन ओमले आदी वारकरी सांप्रदाय मंडळीने कळविले आहे.
Comments
Post a Comment