जासई जिजामाता बस स्थानक ते ऐकटघर रस्त्याची दुरवस्था



अनंत नारंगीकर 
           जेएनपीटी : रायगड जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे उरण तालुक्यातील जासई जिजामाता बस स्थानक ते ऐकटघर मार्गे धुतूम गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.त्यामूळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशी नागरीकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.तरी रायगड जिल्हा परिषदेने सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशी करत आहेत.
        उरण तालुक्यातील धुतूम हे गाव काविळ ग्रस्त रुग्णांना जीवनदान देणारे गाव म्हणून ओळखले जाते.अशा धुतूम गावातील सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ ठाकूर व सौ.कुंदा वैजनाथ ठाकूर यांना या परिसरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदर्श लोकसेवक म्हणून जासई जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून देण्याचे काम हे येथील जनतेने कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता केल आहे.परंतू आज याच मतदारसंघातील जासई जिजामाता बस स्थानक ते ऐकटघर मार्गे धुतूम गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
         रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामूळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या रुग्णांना, प्रवाशी नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तसेच मोटारसायकल स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.तरी या मतदारसंघातील लोकसेवक म्हणून रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ.कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी आपले लक्ष केंद्रित करून पावसाळ्यात तरी रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी रायगड जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय कार्यालयाकडे,प्रकल्प प्रशासनाकडे करावी अशी मागणी या परिसरातील रहिवाशी करत आहेत.

Comments