भाजप तालुकाध्यक्ष ढवळेंचा इशारा
सलीम शेख
माणगाव : गेल्या तीन महिन्यांपासून आलेले कोरोना नावाचे भयानक संकट व त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच ३ जून २०२० रोजी झालेले निसर्ग चक्री वादळ याचा तडाखा यामुळे गोरगरीब सामान्य जनतेचे जिणे मुश्किल झाले असून कामधंदा नसल्याने हातात पैसा नाही अशा परिस्थितीत तीन महिन्याचे अव्वाच्या सव्वा वीजबिले आल्याने वीज बिले कुठून भरणार? असा सवाल जनतेसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष देवून महावितरण कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करून संकटात असलेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणवासियांचे एप्रिल ते जून हे तीन महिन्यांचे घरगुती वीज बिले माफ करावीत अन्यथा याबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात संजयआप्पा ढवळे यांनी पुढे असे म्हटले आहे की ग्राहकांना एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांची एकत्र बिले आली आहेत. ही बिले भरमसाठ आल्याच्या तक्रारी माणगाव तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्याकडे केल्या आहेत. कोरोनाचे तीन महिन्यांपासून असणारे संकट व जूनमध्ये झालेले निसर्ग चक्रीवादळ याचा मोठा फटका कोकणवासियांना बसला आहे. माणगाव तालुक्यात चक्री वादळाचा अनेकांना फटका बसला आहे. गरीब, सामान्य जनतेच्या घरांची झालेली पडझड हे लोक अजुन पैशाअभावी घर ठिकठाक करू शकलेले नाहीत. राज्य शासनाकडून माणगाव तालुक्यात अद्यापपर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आर्थिक परिस्थिती अनेकांची हालाखीची झाली आहे. त्यातच हे तीन महिन्याचे एकदम वीजबिल ग्राहकांच्या हाती आले आहे.
कोकणवासिय कोरोना व चक्रीवादळाच्या संकटात असून त्यांच्याकडे महावितरण कंपनीने वीज बिल भरण्यासाठी सक्ती करु नये. या बाबतीत आपण मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेत्याची भेट घेऊन त्यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे संजयआप्पा ढवळे यांनी सांगून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Comments
Post a Comment