वीजबिले माफ करण्याची मागणी
घनःश्याम कडू
उरण : कोरोना विषाणू संसर्ग महामारीमुळे भयभीत झालेल्या गोरगरीब नागरिकांना वीज कंपनीने अवाढव्य वीज बिले पाठवून जबरी धक्का दिला असून आलेली वाढीव बिले भरण्यास पैसे नसल्याने आधीच कोरोना, निसर्ग चक्रीवादळ यांत भरडून निघालेल्या नागरिकांच्या माथी हि वाढीव वीज बिले मारून अर्धमेल्या नागरिकांना जबरी धक्का बसला आहे. त्यामुळे सरकारने कोरोना काळातील हि वाढीव वीज बिले माफ करावी, अशी मागणी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे करूनही अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.
२० मार्च पासून आजपर्यंतच्या काळात शासनाने आदेश दिल्याप्रमाणे नागरिकांनी घरातच राहून सुरक्षिततेचे कवच आपल्या कुटुंबा भोवती निर्माण केले. या ९० दिवसात घरी राहून लाखो तास मनोरंजन करण्यात घालविले, ऐन कडाक्याच्या गर्मीत पंख्याची हवा अंगावर घेऊन घरात बसणे शक्य झाले ते फक्त सर्वश्रेष्ठ विजेच्या जोरावर! मात्र हि वीज ज्यावेळी बिल रुपी नागरिकांच्या हातात पडली, त्यावेळी नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोरोनाच्या ह्या काळात आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली असून ती व्यवस्थित होण्यास सहा महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. हाताला काम नसल्याने हातावर कमावणारे मजूर, कामगार वर्ग, आदिवासी बांधव, हातगाडीवर कमावणारे छोटे धंदेवाले, बेरोजगार कुटुंब पैशाअभावी दिवस कंठीत आहेत, म्हणून वीज कंपनीने कोरोना काळातील घरगुती वीज बिल गोरगरीब नागरिकांची माफ करावे, अशी मागणी मुख्यमंत्री व वीज मंत्र्यांना करूनही अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही मात्र भरमसाठ बिले पाठवून ग्राहकांचे कमरडेच मोडले आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्या प्रमाणे फक्त १०० रुपयेच वीज बिल घेण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अशा प्रकारची आकारणी करण्यात यावी असे राज्यातील जनतेची मागणी आहे.
शासनाने सांगितले घरी बसा , सुरक्षित रहाल , त्याप्रमाणे नागरिक घरातच बसून आदेशाचे पालन करत होते . मात्र घरी बसल्याने याचा परिणाम टीव्ही, पंखा, एसी यांसारख्या विजेच्या उपकरणांवर झालेला दिसून येत आहे. विजेचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने आत्ता विजेची बिले अवाढव्य आली आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकांचा रोजगार, हाताचे काम थांबले असल्याने पैशाची चणचण सर्वांनाच भासत आहे. हातात पैसा नाही, आतापर्यंत घर सांभाळण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले आहे, त्यामुळे अगोदरच तणावाखाली नागरिक आहेत. याचा सारासार विचार करून मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी ही वीज बिले माफ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Post a Comment