माणगावात आदिवासी बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !
निसर्ग वादळग्रस्त आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करताना.
सलीम शेख
माणगाव : कोरोना महामारीमुळे रोजगार गमावलेल्या व निसर्ग चक्रीवादळात घरांचे, अन्नधान्याचे नुकसान झालेल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना दाखणे गावचे सुपुत्र नीरज उभारे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष दक्षिण मुंबई यांच्यावतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाने रोजगार बुडाला असून निसर्ग चक्रीवादळातही आदिवासी वाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना अन्नधान्य, प्लॅस्टिक सीट, छत्र्या इत्यादी बाबींचे वाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनातून व राजेश श्रीवर्धनकर यांच्या सहकार्यातून सदर मदतीचे वाटप करण्यात आले.
सदर वाटपावेळी दाखणे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच विश्वास उभारे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अडचणीच्या वेळी आदिवासी बांधवांना मदत प्राप्त झाल्याने आदिवासी बांधवांनी आभार व्यक्त केले आहेत.
Comments
Post a Comment