खून करून पळून जाणाऱ्या दोन सख्ख्या भावाना अटक



अनंत नारंगीकर 
           जेएनपीटी : उरण तालुक्यातील द्रोणागीरी नोडमधिल बेस्ट रोडवेज जवळील एका कँटीनमध्ये जेवताना शुल्लक कारणावरून झालेल्या वादात चुलत भाऊ सलमान शकील खान (२४) आणि त्याचे वडील शकिल अवदान खान (५२) यांना कादिर निसार खान आणि साकिर निसार खान या दोन सख्या भावानी जोरदार मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या चुलत भावाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे दोन आरोपीफरार होते. ही घटना रविवार दि. २१ जून रोजी घडली होती. त्यानंतर हे दोन आरोपी फरार होते.
           याबाबत गुरूवार, दि. २५ जून रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यातआला होता. मात्र हे दोन आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होते. अखेर उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी, पोलिस निरिक्षक अतुल आहेर, सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. जी. काठे, अनिल चव्हाण आणि डीटेक्शन ब्रँचचे कर्मचारी यांनी मोबाईलवरील संभाषणादरम्यान त्यांचा ठाव ठिकाणा शोधला आणि त्यांना भिवंडी येथून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ जूलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Comments