उरणमध्ये पुन्हा आज १४ पॉझिटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू

उरणमध्ये पुन्हा आज १४ पॉझिटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू


घन:श्याम कडू         
             उरण : परिसरातील असलेल्या कंपन्यांमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. कंपनी प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करून खबरदारी घेतली नाहीतर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली दोन तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कंपनी कामगारांची संख्या जास्त असते. आज सुद्धा आलेल्या पॉझिटिव्ह आकड्यामध्ये कंपनी कामगारांची संख्या जास्त असल्याचे समजते. आज उरणमध्ये एकूण १४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच आणखीन एकाचा मृत्यू होऊन हा आकडा ८ वर गेला आहे.
            उरणमध्ये आज उरण शहर २, मोरा २, जसखार ३, सोनारी ३, बोकडविरा १, पागोटे १, नागाव १, पाणजे १ असे एकूण १४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर नवीन शेवा १, पागोटे १, गोवठणे १, चिरनेर १, हनुमान कोळीवाडा १ असे एकूण ५ जणांना घरी सोडण्यात आले. आज आणखीन एकाचा कोरोनाने मृत्यू होऊन हा आकडा ८ वर गेला आहे.
            आज एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३६८ तर बरे झालेले २४७, उपचार घेणारे ११४ तर मयत ८ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
           उरणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह बरोबरच मयतांचा आकडाही वाढू लागला आहे. या परिसरातील कंपनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने कंपनी विरोधात ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा उरणमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments