घन:श्याम कडू
उरण : तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्याला आळा घालण्यासाठी तालुक्यातील १३ गावात उद्यापासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून उरणमध्ये नेहमीच ९ ते १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवार, दि. १ जुलै रोजी १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांना घरी सोडण्यात आले आहे. हा आकडा वाढू नये यासाठी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी तालुक्यातील गोवठणे, जासई, दिघोडे, चिरले, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा, म्हातवली, कोटनाका, देऊळवाडी, बोरी, बालई, बोरी पाखाडी, मोरा या १३ गावांत उद्यापासून म्हणजे ३ जुलैपासून १२ जुलैपर्यंत १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment