महेंद्र म्हात्रे
नागोठणे : येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. श्रीकांत रावकर यांनी ' कोरोना योद्धा ' म्हणून केलेल्या विशेष कार्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने अलिबाग येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन अॅड. रावकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, अलिबाग मुरुड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कौस्तुभ पुनकर यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment