जेएनपीटी बंदर परिसरात १० दिवसाचा लॉकडाऊन घोषित करावा
कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी
अनंत नारंगीकर
जेएनपीटी : उरण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात कोविड- 19 कोरोना विषाणू चा फैलाव जोरात सुरु झाला आहे.याचे नेमके कारण हे जेएनपीटी बंदर व या बंदरावर आधारित असणारी इतर बंदरे असून जेएनपीटी बंदरप्रमाणे जी टी आय बंदरात २९ कोरोनो पॉसिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्याच बरोबर न्हावा शेवा पोलीस स्टेशनं मध्ये ११ पोलीस बांधवाना कोरोना ची लागण झालेली आहे.त्यात उरण तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरवात झाली आहे. आणि या सर्व घडामोडींना जेएनपीटी बंदराचे प्रशासन जबाबदार आहे.तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेएनपीटी बंदरात लाँकडाऊन घोषित करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय इंटक काँग्रेसचे सचिव तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या कडे सादर केलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.
कामगार नेते महेंद्र घरत यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदन पत्रकात नमूद करताना सांगण्यात आले आहे की जेएनपीटी बंदरांमध्ये मोठया प्रमाणात अमेरिका, इंग्लंड,चीन, जपान, युरोप, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, आफ्रिका, इराक, इराण, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या ठिकानाहून मोठया संख्येने जहाजे ये जा करत असतात या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा या बंदरानी दिल्या नाहीत. त्याच बरोबर उरण तालुक्यात अनेक ठिकाणी या बंदराचे मोठमोठे कंटेनर यार्ड आहेत हाजारो लोक तिथे आपला जीव धोक्यात घालुन काम करत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा किंवा त्यांचा साधा कोविड- 19 (कोरोना )विमा सुद्धा काढला गेला नाही.तसेच जेएनपीटी चा करोडो रुपयांचा सी एस आर फंड पडुन आहे. जेएनपीटी ने हा फंड इतर जिल्ह्याना दिला, परंतु येथील स्थानिकांना मात्र कधीच देताना दिसत नाही.वास्तविक पाहता याठिकाणी जेएनपीटी ने कोविड- 19 च्या साठी स्वतंत्र अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते परंतु या गोष्टींकडे जेएनपीटी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
तसेच सिडकोने या भागातील जमिनी नाममात्र किमतीत औद्योगिक विकासाच्या नावाखाली संपादित करुन येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या जमिनी घेत असतांना सिडकोने येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती कि तुम्हाला आम्ही सर्व नागरी सुविधा देऊ त्या आजपर्यंत जवळ जवळ ३० ते ३५ वर्षे झाली तरी पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या मध्ये वीज, रस्ते, गटारे, पाणी, शाळा, मैदाने, समाज मंदिर, सुसज्ज हॉस्पिटल परंतु यातील एकही आश्वासन सिडको ने पूर्ण केल नाही. कोट्यावधी पैसे सिडको कडे पडुन आहेत या ठिकाणी या पैसाचा वापर इतरत्र होतो परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीकत्या जमिनी विकासाला दिल्या त्या शेतकऱ्यांना सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे. कोविड- 19(कोरोना ) हॉस्पिटलसाठी सिडकोने मुलूंड ला पैसे दिले परंतु येथिल भूमिपुत्रांसाठी एक रुपया खर्च केला नाही.
एकंदरीत जेएनपीटी आणि सिडको आपले सीएसआर फंड इतर जिल्ह्यात फिरवतात पण ज्या ठिकाणी ते व्यवसाय आपला धंदा करतात त्या ठिकाणी एकही रुपया खर्च करत नाहीत या ठिकाणी मिळणाऱ्या कोविड- 19कोरोना पेशंट चा सर्व खर्च प्रामुख्याने जेएनपीटी आणि सिडको यांनी करावा तसेच आज या ठिकाणी कोविड- 19 कोरोनाची जी परस्थिती उद्भवलेली आहे त्याला सर्वस्वी जेएनपीटी व त्यातील तीन आंतरराष्ट्रीय इतर बंदरे आणि सिडको जबाबदार आहे.तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेएनपीटी बंदर परिसरात तात्काळ १० दिवसांचा कामगारांना भर पगारी लॉकडाऊन घोषित करावा अशी मागणी राष्ट्रीय इंटक काँग्रेस चे सचिव तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी केली आहे.
Comments
Post a Comment