घन:श्याम कडू
उरण : तालुक्यात कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव आता सर्वत्र पसरू लागला आहे. उरणमध्ये आज एकूण १५ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज उरणमध्ये ५, गोवठणे ३, चिरले २, नवघर १, भेंडखळ १, केगाव २, करंजा १ असे एकूण १५ जण पॉजेटीव्ह आढळले असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. तर आज बरे झाले रुग्ण उरण५, करंजा १, धुतूम १, गावठाण १, पाणदिवे १, विंधणे १ असे एकूण १० जणांना आज घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २८७ वर गेला आहे. त्यामध्ये पूर्ण बरे झालेले २१९ आहेत, उपचार घेणारे ६४, मयत ४ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये कोरोना पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने उरणच्या जनतेतभीतीचे वातावरण पसरले आहे. उरणकरांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जागृत रहाणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा यापुढेही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment