माणगाव तालुक्यातील निजामपूर गावात कोरोनाचा शिरकाव

माणगाव तालुक्यातील निजामपूर गावात कोरोनाचा शिरकाव 

तालुक्यात नवे ४ रुग्ण


एकूण   बाधितांची  संख्या ५५ ; निजामपूरकरांना चिंता 


सलीम शेख
            माणगाव : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यातील लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात निजामपूर गावात कोरोनाने शिरकाव केला असून येथे एका २५ वर्षीय तरूणाचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असून माणगाव येथील १, मोर्बा येथील २ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील १३ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी रविवार, दि. ५ जुलै २०२० रोजी सकाळी प्रसार माध्यमांना दिली. त्यानंतर आता माणगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५५ वर पोहचली असून तालुक्यातील मोर्बा गावांत रुग्णांची संख्या वाढत चालल्याने तेथील नागरिकांची  धास्ती वाढत चालली असून निजामपूरवासीय टेंशनमध्ये आले आहेत .
     माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून ते रविवार दि. ५ जुलैपर्यंत १२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी ६७ रुग्ण  बरे होऊन आपल्या घरी गेले असून तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  वैद्यकीय अधीक्षक  डॉ. इंगोले यांनी दिली. तालुक्यातील ३३ गावांतून आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले असून मोर्बा गावांत लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.त्यामुळे मोर्बा गावांतील नागरिकांसह ग्रामपंचायतीची धावाधाव उडाली आहे. ग्रामपंचायत नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. मोर्बा गावांत रुग्ण सापडल्याने आता या विभागातील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. तसेच निजामपूरात पहिलाच कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता निजामपूरातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. याबाबतीत तालुक्यातील जनतेला जागरूकता व सतर्कता बाळगण्याबरोबरच सरकारने केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे

Comments