कोरोनामुळे पर्यटन स्थळे ओस !

कोरोनामुळे पर्यटन स्थळे ओस !

पावसाळी पर्यटनाला मोठा फटका

पावसाळी दरवर्षी गर्दी खेचणारे ओहोळ ,धबधबे सुनसान आहेत.

सलीम शेख
           माणगाव : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदऱ्यातील धबधब्यांचे. अनेकजण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यावर्षी मात्र करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस झाले असून यानिमित्ताने होणारा व्यवसाय रोजीरोटी बंद झाली आहे.
          प्रतिवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाट हा रायगडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरते. ताम्हिणी घाटातील नैसर्गिक रचनेमुळे पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर असे परिसर व मोठमोठाले धबधबे निर्माण होतात. त्यामुळे ताम्हिणी घाट हा पावसाळी पर्यटनाची पर्यटकांची मोठी पसंती असते. यावर्षी पाऊस सुरू होऊन जवळपास एक महिना झाला असून घाटातील धबधबे सुरू झाले आहेत. मात्र कोरोना पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेऊन पर्यटन बंदी असल्याने याचा परिणाम धबधब्यांच्या पर्यटनावरही झाला आहे.
         पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिक लोकांना विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध होतो. चहा टपरी, मके विक्री इत्यादी इत्यादी खाद्यपयोगी वस्तूंना या वेळी चांगली मागणी असते व अनेकजणांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. यावर्षी मात्र कोरोनामुळे पर्यटकांनी धबधब्याकडे पाठ फिरवली असल्याने पावसाळी पर्यटनाला मोठा फटका बसत असून स्थानिकांची रोजीरोटी बुडत आहे.

ADVT


Comments