उरणमध्ये नवे २३ पॉझिटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू
घन:श्याम कडू
उरण : कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आज २३ जण पॉझिटिव्ह आढळले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजचा पॉझिटिव्हचा आकडा मोठा असल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरणमध्ये आज उरण ३, नवघर १, करंजा ८, जसखार १, जेएनपीटी २, केगाव १, चिरनेर १, जासई २, फुंडे १, विंधणे १, धुतूम २ असे एकूण २३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका पेशंटचा ऑक्सिजन अभावी अवेहलना झाल्यामुळे प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे .
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह ३४०, बरे झालेले २३६, उपचार घेणारे ९८ तर मयत ६ झाले असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरणमध्ये दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज एका दिवसात २३ पॉझिटिव्ह व एकाचा मृत्यू झाल्याने उरणकर भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रशासनाने पॉझिटिव्हचा वाढत चाललेला आकडा कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा उरणकरांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Post a Comment