जीवनावश्यक वस्तू महागल्याने घरखर्चात वाढ
संग्रहितसलीम शेख
माणगाव : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमूळे दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या घरगुती स्वयंपाकाच्या वस्तूंनी महागाई गाठल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
देशभरातील लॉकडाऊनमुळे भाजीपाला व अन्नधान्यादी पदार्थांच्या वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. शेतमालाची व अन्नधान्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत या वस्तूंचा तुटवडा होता. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वीचे जीवनावश्यक भाजीपाला व अन्नधान्याचे भाव वाढल्याने लॉकडाऊन काळात गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सर्वसाधारणपणे लॉकडाऊनमुळे प्रवास व इतर बाबी बंद झाल्याने आर्थिक बचत होईल असा अनेकांचा समज होता. अनेक कुटूंब या काळात घराबाहेरही पडली नाहीत. त्यामुळे बाह्य खर्च शून्य टक्के होता. मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किंमती वाढल्याने व सर्व कुटूंबीय घरीच असल्याने खानपान व घरगुती वापर यामुळे दैनंदिन वस्तूंचे वापर वाढले त्यामुळे स्वयंपाक खर्चात वाढ झाल्याचे अनेक गृहिणींनी सांगितले.
लॉकडाऊनपूर्वी असलेल्या भाज्यांच्या किंमती लॉकडाऊन काळात 20 ते 30 टक्क्यांनी वाढले. यामुळेही घरखर्चात वाढ झाली असल्याचे गृहिणी सांगतात.
लॉकडाऊन काळात बाहेरील खर्च कमी झाला आहे. मात्र बाजारातील वस्तू महाग झाल्या असून त्याचा परिणाम घरगुती बजेट वर होत आहे. भाजीपाला व इतर वस्तूंचे दर वाढले आहेत.
- सुप्रिया गाणेकर, गृहिणी,माणगांव
लॉकडाऊनपूर्वी व आताच्या भाजीपाला दरात थोडीफार वाढ झाली आहे. आवक कमी वाहतुकीचा परिणाम यामुळे हे दर वाढले आहेत.
- रोशन वर्मा, भाजी विक्रेता.
भाजी पूर्वी आता
(दर किलोमध्ये)
भेंडी - 40 60
टॉमेटो - 20 ते 30 30 तेे 40
कोथिंबीर- 10 ते 50 20 ते 25
वांगी - 30 60 ते 60
Comments
Post a Comment