ग्रामपंचायतीने रिलायन्सला दिलेल्या पत्राची खा. सुनील तटकरे यांच्याकडून दखल

नागोठणे विभागातील वाढता कोव्हीड प्रादुर्भाव

ग्रामपंचायतीने रिलायन्सला दिलेल्या पत्राची खा. सुनील तटकरे यांच्याकडून दखल

तालुका  प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन आणि विभागातील सरपंचांसोबत चर्चा



महेंद्र म्हात्रे 
              नागोठणे : शहरातील व विभागांतील कोव्हीड १९ चा वाढता प्रादुर्भाव, रिलायन्स कंपनीकडून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेला खेळखंडोबा, यामुळे परिसरांत रिलायन्स कंपनीविरुध्द स्थानिकांच्या मनात निर्माण होणारी खदखद तसेच हा आजार रोखण्यासाठी तालुका प्रशासन, रिलायन्स प्रशासन व  विभागांतील सरपंच व प्रतिनीधींची एक बैठक रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहे येथे आयोजित केली होती.
             या प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, रोहा नगरपालिका सीईओ तसेच रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रोहा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, नागोठणे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, ज्येष्ठ नेते नरेंद्र जैन, शिवराम शिंदे, भाई टके, सदानंद गायकर, रिलायन्सचे वरीष्ठ अधिकारी चेतन वाळंज, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, पिगोंडे सरपंच संतोष कोळी, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, वरवठणे सरपंच तसेच नागोठणे  परिसरांतील सरपंच व आरोग्य विभागांतील  प्रमुख उपस्थित होते.
         
     
          यावेळी पार पडलेल्या चर्चेत खासदार सुनिल तटकरे यांनी रिलायन्स प्रशासनाने जिल्ह्याच्या प्रशासकिय यंत्रणेपासुन कंपनीतील रुग्णांची कोणतीही माहिती दडवून ठेऊ नये, रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या नागोठणे विभागांतील कोव्हीड रुग्णांबाबतची माहीती, विभांगातील त्या-त्या ग्रामपंचायतींना देऊन सहकार्य  करावे, रिलायन्स कंपनीने आजवर आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापुढेही आपली सामाजिक बांधिलकी जपुन विभागातील संशयित कोव्हीड रुग्णांसाठी कंपनीतर्फे बेडची उपलब्धता करुन द्यावी, तसेच विभागांतील रुग्णांना दवाखान्यात ने आण करण्यासाठी रुग्णवाहीका सेवा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी रिलायन्स प्रशासनाला केली. तसेच विभागांत होणाऱ्या अपघाताच्या वेळी रिलायन्स कंपनीतर्फे रुग्णवाहीकेची मदत मिळत नसल्याचा सूर विभांगातील सरपंच व मान्यवरांनी लावुन धरल्याने रिलायन्स कंपनीने नागोठणे येथे अँब्युलन्स उपलब्ध करुन द्यावी अशीही सुचना यावेळी खा. तटकरे यांनी उपस्थित रिलायन्स प्रशासनाला केली.
               रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंञत्रणेवर त्राण पडत आहे. कोव्हीड टेस्टसाठी शासकीय आरोग्य यंत्रणेकडूनच लेखी परवानगी घ्यावी लागत आहे याकडे नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी या मिटींगमध्ये तटकरे यांचे लक्ष वेधुन घेताना पनवेल मेट्रोपोलिस लॅबमध्ये खाजगी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर (Priscribstion) पेशंटची कोव्हीड टेस्ट करुन मिळावी अशी मागणी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत खा. सुनिल तटकरे यांनी रायगडचे सिव्हिल सर्जन यांना पनवेल मेट्रोपोलीसला खाजगी वैद्यकीय अधिका-यांनी चिठ्ठी घेऊन पाठविलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्वरीत लेखी पत्र देण्याची मोबाईव्दारे सुचना केली. काही वेळांतच तसे पत्र पनवेल मेट्रोपोलीसला दिले असल्याचे रायगड सिव्हिल सर्जन यांनी खा. तटकरे यांना दुरध्वनीवरुन सांगितले . डॉ. मिलिंद धात्रक यांनी रायगड मेडिकल असोसिऐशन तर्फे तटकरे व ठाकरे सरकारचे आभार मानले.
             

               तत्पूर्वी तटकरे यांनी रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने आर्थिक मदत केली आहे.परंतु बँकांच्या दुर्लक्षितपणामुळे नुकसानग्रस्तांच्या खात्यांत अद्यापही ही रक्कम जमा झाली नसल्याने संबंधित बँकांना तालुका मँजिस्ट्रेट यांनी पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

Comments