खांब-कोलाड नाक्याला आले जत्रेचे स्वरुप
नंदकुमार मरवडे
खांब-रोहे : १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खांब व कोलाड नाक्यावर दोन दिवस अक्षरक्ष: माणसांची जत्राच भरली होती.
रोहे तालुक्यात जवळपास तीनशे पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळेच रोहे शहरात गेली दहा दिवस कडक लाँकडाऊन ठेवण्यात आला होता. तिच परिस्थिती जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील होती. परंतू जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज प्रशासनाला वाटल्याने दि. १५ जुलै मध्यरात्रीपासून ते २६ या कालावधीत जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खांब व कोलाड नाक्यावर नागरिकांनी अक्षरक्ष: गर्दी केली होती. यावेळी नाक्यावर वाहनांचीही मोठी रहदारी दिसून येत होती.
या गर्दीमुळे कोरोनाची महामारी जणू काही संपलीच आहे या अविर्भावात जो-तो आपापले व्यवहार करीत असताना दिसत होता. किराणा दुकान, भाजीवाले, बिअरबार, दवाखाने, बँका, मेडिकल आदी ठिकाणी फार मोठी गर्दी केली होती. सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे कडक नियम पाळले जात असताना येथे मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरक्ष: फज्जाच उडविला असल्याचे दिसून आले. तब्बल दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारल्याने पावसापाण्याच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंचा साठा असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी स्वतःच्या व परिवाराचे अन्नपाण्याची व्यवस्था करावी तसेच अडचणीच्या काळात गाठीला पैसा असावा म्हणून किराणा दुकान, बँका, मेडिकल व दवाखाने आदी ठिकाणी नागरिकांनी कोरोना महामारीची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या गर्दीमुळे अक्षरशः खांब व कोलाड नाक्याला जणू जत्रेचेच स्वरूप आले होते.

ADVT
Comments
Post a Comment