घन:श्याम कडू
उरण : तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. आज दिवसभरात उरणमध्ये १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
उरणमध्ये आज धुतूम ३, गोवठणे १, सावरखार १, जासई १, रांजणपाडा १, जेएनपीटी १, वेश्वी १, नागाव १, वशेणी १, सोनारी १, नवीन शेवा १ असे एकूण १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर करंजा २ व कोप्रोली १ असे ३ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३०४ वर गेला आहे. त्यामध्ये पूर्ण बरे झालेले २३० रुग्ण आहेत. उपचार घेणारे ६९, मयत ५ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने उरणकरांसाठी चिंताजनक आहे. आज पावसाने सुरुवात केल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तरी उरणच्या जनतेने जागृत रहावून योग्य ती सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment