उरणमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू; ४ कोरोना पॉझिटिव्ह



घन:श्याम कडू     
            उरण : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच असून आज एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  मृतांचा आकडा ५ तर  ४  पॉझिटिव्ह व ८ जणांना घरी सोडण्यात आले.
       उरणमधील मुळेखंड फाटा येथील कोरोनाग्रस्त मृत्यू झाला आहे. यामुळे उरणमध्ये कोरोनाने मृत्यू होण्याचा आकडा ५ वर गेला आहे. कोरोना  पॉझिटिव्हचा आकडा आज ४ वर गेला आहे. उरणमध्ये आज उरण १, उरण पोलीस स्टेशन १, मुळेखंडफाटा १, सारडे १ असे एकूण ४ जण  पॉझिटिव्ह आढळले आहेत. घरी सोडलेले उरण ३, जासई १, गोवठणे २, करंजा १, नागाव १ असे एकूण ८ जणांचा समावेश आहे. तर मुळेखंडफाटा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
           आज एकूण  पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा २९१ वर गेला आहे. त्यामध्ये पूर्ण बरे झालेले २२७  आहेत, उपचार घेणारे ५९, मयत ५ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. आज आणखीन एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हा आकडा वाढत जाऊन ५ वर गेला आहे. त्यामुळे उरणकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

Comments