उरणमध्ये आज ३० पॉझिटिव्ह रुग्ण ; अनेकजण तापाने फणफणले
घन:श्याम कडू
उरण : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आज उरणमध्ये ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मोठा आल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. उरणमध्ये अनेकजण तापानी फणफणत आहेत.
उरणमध्ये आज उरण ६, चिरले २, आवर १, जसखार १, जेएनपीटी १, करंजा १, बोकडविरा १, बोकडविरा द्रोणागिरी ४, म्हातवली २, विंधणे १, चिरनेर १, जांभूळपाडा २, चाणजे १, जासई २, नवीन शेवा १, ओएनजीसी १, वेश्वी १, सोनारी १ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह सापडले. तर जेएनपीटी २, बोकडविरा १, म्हातवली १, चाणजे १, वेश्वी १, सोनारी २ असे एकूण ८ जणांना घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४६८, बरे झालेले २८२, उपचार घेणारे १७६ तर मयत १० झाले असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरणमध्ये अनेकजण तापानी फणफणत आहेत. ते खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामध्ये राजकीय मंडळींचा समावेश असल्याचे समजते. उरणमध्ये दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज एका दिवसात ३० पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने उरणकर भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रशासनाने पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढत चाललेला आकडा कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांची हालत गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ADVT
Comments
Post a Comment