उरण शहरात दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई
संग्रहित
अनंत नारंगीकर जेएनपीटी : उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आत्ता प्रशासनाने कठोर
उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
उरण पोलिस आणि उरण वाहतूक पोलीस यांनी उरण शहरात विनाकारण फिरून शहरात गर्दी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. यामध्ये डबलसिट, मास्क, हेलमेट न वापरणे, परवाना नसणे अशा दुचाकीस्वारांवर कारवाया करण्यात आल्या. यामध्ये शहरात दुचाकीवर डबलसिट फिरण्यास बंदी असताना देखिल डबल सिट फिरणाऱ्या २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर मास्क, हेलमेट नसलेल्या २५० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईव करण्यात आली. या कारवाईमध्ये उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक माणिक नलावडे यांनी भाग घेतला होता. येत्या काही दिवस अशा प्रकारच्या कारवाया तालुकाभरात सूरू ठेवण्यात येतील असे जगदिश कुलकर्णी आणि माणिक नलावडे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment