वरवठणे गाव कोरोनामुक्त



महेंद्र म्हात्रे
           नागोठणे : शहराचे शेजारील वरवठणे ग्रामपंचायत हद्दीत असणारे सर्व कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होवून घरी परतले आहेत. नव्याने एकही नागरिक संशयित नसल्याने आमचा गाव कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ज्येष्ठ ग्रा. पं. सदस्य गणपत म्हात्रे यांनी दिली. याच गावात दहा दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील आठ व्यक्तींना कोरोनाची लागण लागली होती व नवी मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते. गावातील सर्व नागरिक पुन्हा या ठिकाणी कोरोनाची लागण होऊ नये.

Comments