वार्ताहर
जेएनपीटी : उरण पोलिसांनी खून प्रकरणी दोन आरोपींना नुकतेच अटक केली होती. मात्र या आरोपींपैकी एका आरोपीची कोव्हीड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने पोलिसांची घाबरगुंडी उडाली आहे. दरम्यान सुरक्षिततेचे उपाय म्हणून नगरपरिषदेने संपूर्ण उरण पोलिस ठाण्याला सॅनिटायझरींग करण्यात आले आहे. तर या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
द्रोणागीरी नोड मधिल बेस्ट रोडवेज जवळ किरकोळ कारणावरून दोन सख्या भावांनी चुलत भावाची हत्या केली होती. या प्रकरणात उरण पोलिसांनी सोमवार दि. २९ जून रोजी या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना ६ जूलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हे दोन्ही आरोपी उरण पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. दरम्यान बुधवारी या आरोपींची कोरोना चाचणी केली असता एका आरोपीला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आरोपींची चौकशी जे अधिकारी व पोलिस करत होते त्यांना क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment