रोहा तालुक्यात आज आढळले कोरोनाचे ६ बाधित रुग्ण
केशव म्हस्के
खारी-रोहा : रोहा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. आज प्रशासानाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनो रुग्णाचा आकडा २४० वर जाऊन पोहचल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत.
कोरोनाने संपूर्ण जगामधे चांगलीच दहशत माजवली. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केले मात्र कोरोना आटोक्यात आला नाही. मुंबई, पुणे येथे वाढणारा कोरोना ग्रामीण भागात कधी येऊन पोहोचला हे कळले सुद्दा नाही. रोहा तालुक्यात प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती. मात्र हा अति संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक होते, ते झाले नाही. रोह्यात आज कोरोनाचा आकडा २४० वर पोहचला ही रोहेकरांसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. रोह्यात सुरूवातीला ऐनवहाल, मालसई, पाले व घोसाले येथे रुग्ण आढळले. त्यानंतर वरसगाव, रोहा शहर,पडम येथे रूग्ण वाढले. इथपर्यंत परिस्थिती आटोक्यात असताना धाटावमधील सुदर्शनने कोरोनचा बॉम्ब टाकल्याने हजारो कामगार असलेल्या कंपनीत काही रूग्ण सापडले आणि रोह्यात हाहाकार माजला. जवळपास १०० पेक्षा अधिक रूग्ण याठिकाणी आढळले आहेत, पुढे आकडा किती वाढेल हे सांगणे कठीण झाले आहे.
रोहा बाजारपेठ ३ जुलैपासून पूर्णत: बंदच केली असली तरी कंपनीतले बाधित रुग्ण कुणाला भेटले असतील याची माहिती घेणे महत्वाचे आहे. ही साखळी तोडण्याकरिता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रोहयातील एका नामांकित हाँटेल मालकाला कोरोना झाला आहे. त्यांचे उपचार मोठ्या दवाखान्यात सुरु आहेत तर अनेक रूग्ण आढळत आहेत. हे रोहयावर आलेले संकटच असुन या संकटाला मोठ्या धीराने, संयमाने तोंड देणे गरजेचे आहे. आजचे नवे बाधित रुग्ण ०६, पुढील उपचार करिता ७५, आज पर्यंत मृत व्यक्ती २, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १६३ आहे तर एकूण बाधित रुग्ण संख्या २४० झाले आहेत. खबरदारी म्हणून स्वसंरक्षणासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वत:ची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे तालुका प्रशासन यंत्रणेने सांगितले आहे.
तालूक्यात रुग्णांचा आकडा २४० वर

ADVT
Comments
Post a Comment