पिगोंडे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा गौरव
नागोठणे : कोरोनाच्या महामारीत जीवाची बाजी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा आज आमचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीचे वतीने महत्वपूर्ण साहित्याचे वाटप करीत असल्याबद्दल मला निश्चितच अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार सरपंच संतोष कोळी यांनी काढले.
विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीचे वतीने हद्दीतील गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, महावितरण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा गौरव समारंभ ग्रामपंचायतीचे सभागृहात पार पडला. यावेळी या सर्व कोरोना योद्ध्यांना सॅनिटायझर, मास्क,फेस शिल्ड, हँड ग्लोव्हज या साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपसरपंच सखाराम घासे, ग्रामपंचायत सदस्य नाना बडे, कांचन माळी, नेत्रा पारंगे, गीता पाटील, शैलेश शेलार, रंजना माळी, कुसुम बावकर, धनाजी पारंगे, ग्रामसेवक विजय अहिरे यांचेसह सुधाकर पारंगे, गोरखनाथ पारंगे, विजय मांडुलस्कर, यादव माळी, यशवंत कर्जेकर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक यशवंत कर्जेकर यांनी विभागात असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ही पिगोंडे ग्रामपंचायत पहिलीच ठरली असून ज्यांच्याकडून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले. तर, डॉ. चेतन म्हात्रे यांनी या ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने सर्व नागरिकांनी कायम मास्कचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी कांचन माळी, सुधाकर पारंगे यांची सुद्धा भाषणे झाली.
कोरोना योध्दा म्हणून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा गौरव करताना सरपंच संतोष कोळी. सोबत इतर मान्यवर. (छाया / महेंद्र म्हात्रे)
महेंद्र म्हात्रेनागोठणे : कोरोनाच्या महामारीत जीवाची बाजी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा आज आमचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीचे वतीने महत्वपूर्ण साहित्याचे वाटप करीत असल्याबद्दल मला निश्चितच अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार सरपंच संतोष कोळी यांनी काढले.
विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीचे वतीने हद्दीतील गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, महावितरण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा गौरव समारंभ ग्रामपंचायतीचे सभागृहात पार पडला. यावेळी या सर्व कोरोना योद्ध्यांना सॅनिटायझर, मास्क,फेस शिल्ड, हँड ग्लोव्हज या साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपसरपंच सखाराम घासे, ग्रामपंचायत सदस्य नाना बडे, कांचन माळी, नेत्रा पारंगे, गीता पाटील, शैलेश शेलार, रंजना माळी, कुसुम बावकर, धनाजी पारंगे, ग्रामसेवक विजय अहिरे यांचेसह सुधाकर पारंगे, गोरखनाथ पारंगे, विजय मांडुलस्कर, यादव माळी, यशवंत कर्जेकर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक यशवंत कर्जेकर यांनी विभागात असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ही पिगोंडे ग्रामपंचायत पहिलीच ठरली असून ज्यांच्याकडून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले. तर, डॉ. चेतन म्हात्रे यांनी या ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने सर्व नागरिकांनी कायम मास्कचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी कांचन माळी, सुधाकर पारंगे यांची सुद्धा भाषणे झाली.
Comments
Post a Comment