हॉटेल, खाद्य विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
घनःश्याम कडू
उरण : राज्य सरकारने अनलॉकमध्ये खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल यांना काही नियम घालून एकावेळेस आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहक अशी अट घालून व्यवसाय करण्यास परवानगी दिली खरी, मात्र कर्जतमध्ये या नियमांचे हॉटेल मालकांकडून तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे.
शहरातील बहुतांश हॉटेल हे छोट्या जागेत आहेत. सर्व टेबल एकदम जवळ जवळ असतात. दोन रांगेतून एक माणूस जेमतेम ये-जा करेल असे असूनही हॉटेल मालक येणार्या ग्राहकांना गर्दी करण्यापासून रोखू शकत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र या अशा हॉटेल मालकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची, वाढण्याची दाट शक्यता असल्याने नागरीकातून भीती व्यक्त केली जात आहे. खेदाची बाब म्हणजे नगरपरिषद प्रशासन याबाबत अत्यंत उदासीन असून या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची संतप्त भावना नागरीकांतून व्यक्त होत आहे. वडापाव तसेच खाद्य पदार्थ विक्रेतेही अशाच प्रकारे बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र आहे.
Comments
Post a Comment