महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुलाबा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुलाबा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
अलिबाग : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ०२ ऑक्टोबर रोजी, सायं. ४ वा. अलिबाग येथील कुलाबा किल्ला येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment