उरणमध्ये आज १२ पॉझिटीव्ह रुग्ण तर २ मयत

उरणमध्ये आज १२ पॉझिटीव्ह रुग्ण तर २ मयत


घन:श्याम कडू

           उरण : आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १२ जण सापडले आहेत. १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज २ मयत आहेत. आज एकूण पॉझिटीव्ह १८७७  उपचार करून बरे झालेले १६३४, उपचार घेणारे १४६, मयत ९७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.  

          आज चिरले १, केगाव १, बोरी २, ग्रँडवेल कॅम्पक्स मोरा १, नवेनगर करंजा १, भवरा १, चारफाटा ओएनजीसी १, द्रोणागिरी २ असे एकूण १२ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. ग्रँडवेल कॅम्पक्स मोरा २, बोकडविरा २, गणेश सोसायटी १, करंजा कोंढरीपाडा १, कामठा १, वशेणी २, विंधणे १, ओएनजीसी उरण २, मांगीरदेव उरण १ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर मुळेखंड  तेलीपाडा १, उरण १ असे २ जण कोरोनाने मयत झाले आहेत.

     उरणमध्ये आज पॉझिटीव्ह व उपचार करून घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा कमी वाटत असला तरी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, या भ्रमात कोणी राहू नये.

Comments