पाकड्यांचा अंदाधुंद गोळीबार, हिंदुस्थानचे तीन जवान कश्मीर सीमेवर शहीद

पाकड्यांचा अंदाधुंद गोळीबार, हिंदुस्थानचे तीन जवान कश्मीर सीमेवर शहीद


जम्मू            

        वृत्तसंस्था : चीनपाठोपाठ पाकिस्तानलाही युद्धाची खुमखुमी आली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिह्यात नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले असून पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.

         चीनच्या युद्धखोरीमुळे लडाख सीमेवर सहा महिन्यांपासून युद्धजन्य वातावरण आहे. त्यातच पाकिस्तानलाही युद्धज्वर चढला आहे. जम्मू-कश्मिरात कुपवाडा जिह्यात नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानी चौक्यांवर तुफान गोळीबार केला. पाकिस्तानी लष्कराने उखळी तोफांचाही मारा केला. यात दोन जवान शहीद तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

          कुंछ सीमेवरही कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. यात लान्सनायक कर्नेलसिंग हे शहीद झाले. या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांत पाकिस्तानने तीन हजारपेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचा भंग करून गोळीबार केला आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने सर्वात जास्त 47 वेळा शस्त्रसंधी मोडली.

Comments