मेंढ्यांच्या कळपाला ट्रकची धडक
मनोज कळमकर
खालापूर : जुन्या मुंबई-पूणे महामार्गावर मद्यधुंद ट्रकचालकाने मेंढपाळ महिलेला धडक देत ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत मेंढपाळ महिला गंभीर जखमी झाली असून चार मेंढ्या जागीच गतप्राण झाल्या. ऑक्टोंबर उजाडताच मेंढपाळ कळप डोंगरमाथा उतरून हिरवा चाऱ्यासाठी खालापूर भागात येतात. महामार्गालगत संध्याकाळी वस्ती करतात. मंगळवारी अशाच कळपाला कलोते गावाच्या हद्दीत मद्यधुंद ट्रकचालकाने धडक दिली. जखमी महिलेला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Comments
Post a Comment