पत्रकार संतोष पवारांच्या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरूच
मुकुंद रांजाणे
माथेरान : येथील पत्रकार तथा महाराष्ट्र न्यूज 24 चे संपादक कै. संतोष पवार यांचे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन ९ सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्य झाला होता. त्यांना शासकीय मदत मिळावी याकरिता गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत आणि माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची त्यांच्या शासकीय "जेतवन" या मलबार हिल येथील बंगल्यावर भेट घेतली.
या वेळेस त्यांना नगराध्यक्षानी संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन दिले. त्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनास प्रस्ताव पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना सूचना केल्या आहेत तसेच माथेरान येथील हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी देखील मंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले होते या विषयाला अनुसरून त्यांनी माथेरानच्या रुग्णालयाला Bi-pap/C-pap मशीन आणि एक डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रायगड यांना केल्या असून माथेरान नगरपरिषदेच्या बी. जे. रुग्णालयात त्याची लवकरच पूर्तता केली जाण्याची आशा बाळगली जात आहे. या वेळेस माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी तसेच गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत उपस्थित होते.
Comments
Post a Comment