जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते संकलन व लेखन पुस्तकाचे प्रकाशन
विनायक पाटील
पेण : ८ ऑक्टोबर रोजी नरेंद्र म्हात्रे यांच्या संकलन व लेखन केलेल्या इ १० वी मराठी भाषाभ्यास व्यकरण व पत्रलेखन या पुस्तकाचे प्रकाशन मा. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नरेंद्र म्हात्रे यांचे कौतुक केले. मुबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रयत्न केले. इयत्ता १० वीच्या परीक्षेत मराठी विषयात शेकडो विध्यार्थी अनुत्तीर्ण होतात त्याचा फटका जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसतो या भागातील विद्यार्थ्यांनचे शुद्धलेखन, वाचन कमी पडल्यामुळे मराठी विषयात गुण कमी मिळतात. याचा विचार करूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भाषाभ्यास, व्यकरण, पत्रलेखन पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे.
पेण तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील ग्रंथालयांना मोफत पुस्तक दिले जातील असे नरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले. गेल्या २० वर्षा पासून ग्रामीण भागात शिक्षण सेवेत आहेत. तसेच प्रत्येक ग्रामीण भागातील विध्यार्थी शिकला पाहिजे असा त्यांचा ध्येय आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच नरेंद्र म्हात्रे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment