उरणमध्ये कोरोनाची पुन्हा उसळी
आढळले १९ पॉझिटीव्ह रुग्ण
घन:श्याम कडू
उरण : आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १९ जण सापडले आहेत. आज उपचार करून १५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही. उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दोन हजारच्या पुढे गेला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह २००६, उपचार करून बरे झालेले १७९८, उपचार घेणारे १०६, मयत १०२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज काळाधोंडा उरण १, द्रोणागिरी २, म्हात्रे वाडी १, नेव्हल स्टेशन करंजा २, विनायक कुंभारवाडा १, परिचय सोसायटी सातराठी ८, डाऊर नगर १, आवरे १, नागाव १, कोप्रोली १ असे एकूण १९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर म्हात्रेवाडी ३, सातराठी १, नागाव ५, उरण २, सारडे १, गोवठणे १, द्रोणागिरी कविमल १, कामगार वसाहत १ असे एकूण १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
आज कोणीही मयत नाही.
उरणमध्ये आज कोरोना पॉझिटीव्हचा आकडा जरा जास्त आलेला आहे. तर उपचार करून घरी सोडण्यात आलेला आकडाही जास्त आहे. तसेच कोणीही मयत नाही. त्यामुळे उरणकरांनी आणखीन सावधानता बाळगली तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment