आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाड येथे विविध कार्यक्रम संपन्न
वार्ताहर
खांब-रोहे : महाराष्ट्र राज्य विधान परिषद आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाड येथे विभागिय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते यांनी विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी कुष्ठरोगी भिक्षेकरी गृह पुई कोलाड येथे अन्नधान्य, भेटवस्तू तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाफारा किट, मास्क, सँनिटायझर व हँण्डवाँश आदी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संजय राजिवले, संजय मांडलुस्कर,संदीप जाधव, दिनेश पाशिलकर, प्रविण धामणसे, दर्शन मांडलुस्कर, सुनील आंब्रुसकर, छोटू सकपाल, अजय राजिवले आदी उपस्थित होते.
कोकणचे भाग्यविधाते खा. सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे या नेत्यांचा वाढदिवस दरवर्षी कोलाड विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने आ. अनिकेत तटकरे यांचा १५ आँक्टो. रोजीचा संपन्न झालेला वाढदिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमांनी साजरा केला असल्याची प्रतिक्रिया युवा कार्यकर्ते संजय राजिवले यांनी दिली.
Comments
Post a Comment