माणगावात १९ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा सभा
खा. सुनील तटकरेंसह पालकमंत्री आदिती व आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती
वार्ताहर
माणगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माणगाव नगरपंचायत शहर कार्यकर्त्यांची आढावा सभा खा. सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश लाड, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष ,जिल्हा परीषद सदस्य, पं. स. सभापती, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१९ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ४ वा. कुणबी भवन माणगाव येथे आयोजित केली असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे व शहराध्यक्ष महामूद धुंदवारे यांनी प्रसार माध्यमांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
सदर सभेत माणगाव तालुक्यातील व शहरातील विकासकामे व अन्य प्रश्नांचा आढावा घेण्यात येवून पक्षश्रेष्ठी खा. सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आ अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड हे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या सभेला उपस्थित राहणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोविड १९ विषाणू रोगाचे पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानानुसार सोशल डीस्टन्सिंग व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी अशी विनंती तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment