तयार भातपिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ!
चर खोदाई व थेट झोडणीला प्राधान्य
सलीम शेख
माणगांव : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढविल्या असून तयार झालेले भातपिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
जून महिन्यात या वर्षी वेळेत सुरु झालेल्या पावसाने लावणीची भातशेतीची कामे वेळेत झाली होती.दमदार पावसाने भातपिक जोमदार आले आहे.मात्र परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपले असून तयार भातपिक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. तयार भातशेतीत पावसाचे पाणी साचून राहत असल्याने भाताची काडी कमकुवत होत आहे.त्यामुळे भाताची लोम्बीवर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून तयार भातपीक वाचवण्यासाठी शेतकरी शेतातून चर काढत आहेत.थोडया थोड्या प्रमाणात भातशेती कापणी करत आहेत.ज्यामुळे पूर्ण पीक वाया जाणार नाही असे उपाय शेतकरी करत असून तयार भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. यासाठी जादाचे परिश्रम मजूरकर घ्यावे लागत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
––––––––––––––––––––––––––––––
तयार भातशेतीतील पाणी काढण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. अगदीच तयार झालेला भात तातडीने कापणी करून त्याची लगेच झोडणी केली जात आहे. जेणेकरून कमीत कमी हानी होईल असे उपाय शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------------------------------------------------------
भातशेती पूर्ण तयार झाली आहे. परतीचा पाऊस शेतीचे नुकसान करीत आहे. या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने तयार भातपिकाचे नुकसान होते आहे. हे टाळण्यासाठी तातडीनं शेतातील पाणी चर खोदून बाहेर काढावे लागत आहे. यासाठी जादाचे परिश्रम व मजुरकर लागत आहेत.त्यामुळे आर्थिक फटकाही बसत आहे.अगदीच जास्त तयार भातपिक तातडीने कापून त्याची झोडणी करावी लागते आहे.त्यामुळे परतीच्या पावसाने मोठी धावपळ उडाली आहे व आर्थिक फटका बसत आहे.
नारायण शेपुंडे -शेतकरी, माणगांव
-----------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment