पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते खांब आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन
नंदकुमार मरवडे
खांब-रोहे : रोहे तालुक्यातील खांब येथे रायगड जिल्हा पररिषदेच्यावतीने आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते दि. ३ ऑक्टोबर रोजी पार पडले.
यावेळी पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधूकर पाटील, जि. प. सदस्य दयाराम पवार, ज्येष्ठ नेते नारायण धनवी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, तहसिलदार कविता जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, डॉ. अभय ससाणे, नागोठणे आरोग्य केंद्राचे डॉ. चेतन म्हात्रे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, बाबूराव बामणे, वसंत मरवडे, तानाजी जाधव, राम कापसे, पं.स. मा. सभापती विना चितळकर, सदस्या सिद्धी राजिवले, रा. काँग्रेसचे मा. युवक अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, किरण मोरे, मनोज चितळकर, नरेंद्र पवार, जनार्दन महाबळे, प्रदीप चोरगे, संतोष टवळे, सरपंच सुरेखा वाघमारे, के. वाय. बारदेशकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सध्या वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर जनतेला आरोग्य केंद्राचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी ज्या आरोग्य केंद्रांची कामे पुर्ण झाली आहेत. तेथील आरोग्य केद्रांचे उद्घाटन करून सुरू करण्याची शासनाची जबाबदारी असल्याने याचा अधिक लाभ कसा होईल हाच यामागचा उद्देश आहे. तर खांब येथील बांधण्यात आलेली इमारत अतिशय सुंदर व सर्व सोयींनी परिपुर्ण अशी इमारत असून हे आरोग्य केंद्र महामार्गालगत असल्याने याचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने होईल. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर येथे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हे या केंद्राचे ठळक वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. तर जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य केंद्रांचीही कामे लवकरच मार्गी लावण्याचे आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत. जेणेकरून ग्रामीण जनतेला याचा अधिक लाभ घेता येईल असे शेवटी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सरपंच मनोज शिर्के यांनी केले तर विनोद पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
Comments
Post a Comment