करंजा टर्मिनल बंदराने स्थानिकांना न्याय देवून थकीत ६१ कोटींचा शासनाचा महसूल भरावा - संजय नाईक

करंजा टर्मिनल बंदराने स्थानिकांना न्याय देवून थकीत ६१ कोटींचा शासनाचा महसूल भरावा - संजय नाईक


वार्ताहर

          जेएनपीटी : उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी, कोळी बांधवांनी करंजा टर्मिनल बंदराच्या उभारणीसाठी अल्प किमतीत शेत जमिनी संपादित करुन दिल्या आहेत. परंतु या बंदरामूळे पारंपरिक मासेमारी करणारा कोळी, आगरी समाज संकटात सापडणार आहे. तरी या परिसरातील कोळी, आगरी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शासनाचा थकीत असलेला ६१ कोटी २७ लाखांचा महसूल शासनाकडे भरण्यासाठी करंजा टर्मिनल बंदर व्यवस्थापनानी पुरवठा घ्यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

         रायगड जिल्ह्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कोळी, आगरी बांधव तसेच जिल्ह्यातील इतर गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधर यांच्या दालनात गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन या परिसरातील शेतकऱ्यांच्या, कोळी, आगरी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यायाची मागणी केली. तसेच उरण तालुक्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या करंजा टर्मिनल लोजिस्टीक या कंपनीने संपादित केलेल्या जागेवर महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग तहसीलदार यांची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे दगड, माती, मुरूम याचा भराव टाकल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने रु. ६१, २७, ६४, ८०० /- दंड नोटीस देऊन सुद्धा आजतागायत पर्यंत ती थकीत रक्कम भरण्यात आली नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने करंजा पोर्ट कडून सदर निधी जमा करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच उरण रेल्वे प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतजमीनीचा आर्थिक मोबदला स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी ही करण्यात आली

     यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस  तथा वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष - देवेंद्र गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस  आरिफ शेख, उपाध्यक्ष महेश पोरे, नितीन खानविलकर, अभिषेक दर्गे, महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे सरचिटणीस  शेखर जाधव, चिटणीस सत्यवान भगत, माजी तालुकाध्यक्ष सुनील भोईर आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments