नवी मुंबईत तीन वाहनांचा अपघात

नवी मुंबईत तीन वाहनांचा अपघात


      नवी मुंबई : नवी मुंबईत सीबीडी बेलापूर उड्डाण पुलाशेजारी तीन वाहने एकमेकांवर आदळली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.

        सीबीडी उड्डाणपूलाशेजारून पनवेलच्या दिशेने जाणार्‍या कारने वेग कमी केल्याने मागील दोन कार पुढील कारवार आदळल्या. त्यामुळे एक कार  रस्त्याकडेला असलेल्या झाडीत उलटली. मात्र यातून कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उटलेल्या कारमधील एका इसमास किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईत सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत असताना हा अपघात झाल्याने वाहतूक देखील काहीशी मंदावली होती. पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने उलटलेल्या वाहनात अडकलेल्यास बाहेर काढले व वाहतूक सुरळीत केली.

Comments