संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे निधन

संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे निधन



     वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसिद्ध संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास समता नगर कादिवली-मुंबई येथे निधन झाले.

      लॉकडाऊन कालावधीत ते आपल्या कुटुंबियांसमवेत मुंबई येथून शिरोडा येथे गावी आले होते. कालच ते सकाळी मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र मुंबईत पोहचल्यावर मुलगा जयेश नाईक यांच्या रहात्या घरी त्यांचे पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चत पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Comments